Video- ‘दबंग 3’चं पहिलं गाणं पाहिलंत का?

892

सलमान खान अभिनित दबंग 3 हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. दबंगच्या आधीच्या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. त्यामुळे सलमान खानला आता पुन्हा एकदा चुलबुल पांडेच्या रुपात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सलमानच्या पहिल्या दबंग या चित्रपटातलं हुड हुड दबंग हे गाणं चांगलंच गाजलं होतं. त्या गाण्याचा रिमेक दबंग 3मध्येही पाहायला मिळणार आहे. नुकताच या गाण्याचा व्हिडीओही प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यात चुलबुल पांडे पुन्हा एकदा हुड हुड म्हणत या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. सलमानसह सोनाक्षी सिन्हा, प्रमोद खन्ना, सुदीप किच्चा असे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

तसंच अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरही या चित्रपटातून पदार्पण करत आहे. सईच्या भूमिकेचं नाव खुशी असणार असून ती चुलबुलच्या भूतकाळात त्याची प्रेयसी असल्याचं दाखवण्यात येणार आहे. तिचा चित्रपटातला लूक पाहून अनेक चाहते घायाळ झाले आहेत. सई आणि सलमानखेरीज या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, प्रमोद खन्ना, सुदीप किच्चा असे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. प्रभुदेवा दिग्दर्शित दबंग 3 हा चित्रपट येत्या 20 डिसेंबर 2019 रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या