आदित्य ठाकरे LIVE – काय आहे मुंबई 24×7?

4976

गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मंत्रालय येथे पत्रकार परिषद घेऊन ‘मुंबई 24 तास’बद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

  • जर एखाद्या मॉल किंवा Establishment ला वाटलं की इथे सेक्युरिटीची गरज आहे तर त्यांना आपण प्रायव्हेट सेक्युरिटीची संधी देतोय किंवा ते पोलिसांना पैसे देऊन पोलिस सेक्युरिटी घेऊ शकतात म्हणजे पोलिसांचा पण रेव्हेन्यू वाढेल. कुठेही आपण एक्साईजचे कायदे बदललेले नाही.
  • अनिवासी क्षेत्रातील मॉल किंवा मिल कंपाऊंडमध्ये पार्किंग असते, CCTV असतात, घनकचरा व्यवस्थापन असतं, डेसिबल लिमिट असते, सर्व दुकानं परवानाधारक असतात. या सर्व दुकान, ईटरिज, थिएटर्सला आपण 24 तास खुले राहण्याची संधी देत आहोत, कुठेही त्यांना एन्फोर्स नाही करत आहोत.
  • मुंबईमध्ये जे टुरिस्ट येतात ते साधारणपणे 36 तास येऊन निघून जातात, आपल्या मुंबईत रोजगार आणि महसूल वाढवण्यासाठी ‘मुंबई 24 तास’ या संकल्पनेची आपण अंमलबजावणी करत आहोत.
  • आपल्या मुंबईमध्ये महसूल, रोजगार वाढवायचं असेल तर ‘मुंबई 24 तास’ ही संकल्पना मी 2013 मध्ये आणली होती, आता आपण त्याची अंमलबजावणी करत आहोत – आदित्य ठाकरे

 

आपली प्रतिक्रिया द्या