
गुजरातमधील जामनगर इथे खेळला जाणारा हा पारंपरिक मशाल गरब्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. मशाल रासची सुरुवात 1957 मध्ये झाली. पटेल युवक गरबी मंडळाने सादर केलेला हा नेत्रदीपक नृत्यप्रकार आहे. स्थानिक मंडळांनी इतक्या वर्षांनी ही परंपरा जपली आहे. नियमित गरबा किंवा दांडियापेक्षा वेगळा असा हा गरबा रास आहे. यामध्ये सादर करणारे मशाली हातात घेऊन गरब्याच्या तालावर ठेका धरतात. मशाल रासचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा हा गरबा खेळणारे मशाली हातात घेऊन गरब्याच्या तालावर नाचतात, तेव्हा ते जमिनीवरही आग पसरवतात आणि त्यावर नाचतात. पारंपरिक गरबी तालांशी सुसंगत राहून कलाकारांना अगदी सहजपणे मशाली हाताळताना पाहून प्रेक्षकही मंत्रमुग्ध होतात.