ट्रेंड – महिलेच्या कंबरेत लाथ!

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर फेमस होण्यासाठी यूजर्स वाट्टेल ते कांड करत आहेत. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. दोन मैत्रिणींनी मेट्रोमध्ये एक व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये मेट्रोचा दरवाजा उघडताच एक महिला दुसऱ्या महिलेच्या कंबरेत लाथ घालताना दिसत आहे. या महिलेच्या कंबरेत लाथ बसल्याने ती महिला प्लॅटफॉर्मवर खाली पडताना दिसत आहे. तर लाथ घालणारी महिला हसत आहे. या व्हिडीओची सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. व्हिडीओ बनवण्यासाठी महिला काहीही करू शकतात, हेच या व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओत दिसणाऱ्या दोन्ही महिला या मैत्रिणी असल्या तरी यातून दुर्घटना घडण्याची शक्यता होती. यामुळे अनेक यूजर्संनी नापसंती दर्शवत कमेंट केल्या आहेत.