Video – रणवीर सिंगने लाँच केलं ’83’ सिनेमाचं मोशन पोस्टर, तुम्ही पाहिलंत का?

699

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ’83’ या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. काही दिवसांआधी या सिनेमाच्या संपूर्ण टीमचा पहिला लूक शेअर केला होता. त्यानंतर या सिनेमाचं मोशन पोस्टर समोर आलं आहे. या पोस्टरच्या मध्यभागी रणवीर सिंग असून, त्याच्या बाजूला संघाचे सर्व सदस्य आहेत. अभिनेता रणवीर सिंगने चेन्नई येथे सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले असून, यावेळी कपिल देव आणि दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवसाआधी प्रदर्शित केलेल्या या पोस्टरमध्ये संपूर्ण संघाची झलक दिसत आहे. पोस्टरच्या बॅकग्राउंडमध्ये तिरंगा दिसतोय. या सिनेमात रणवीर सिंग हा कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. त्या व्यतिरिक्त सुनिल गावस्कर यांच्या भूमिकेत ताहीर राज भसीन, संदीप पाटील यांच्या भूमिकेत चिराग पाटील, कीर्ती आझाद यांच्या भूमिकेत दिनकर शर्मा, रॉजर बिन्नी यांच्या भूमिकेत निशांत दहिया, मदन लाल यांच्या भूमिकेत हार्डी संधू, सैयद किरमानी यांच्या भूमिकेत साहिल खट्टर, बलविंदर यांच्या भूमिकेत अॅमी विर्क, दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे, रवि शास्त्री यांच्या भूमिकेत धैर्य करवा, सुनील वॉल्सन यांच्या भूमिकेत आर. बद्री आणि पीआर मान सिंह यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहेत.

या कार्यक्रमात रणवीर सिंगने सिनेमाशी सबंधित काही प्रसंग चाहत्यांबरोबर शेअर केले. त्याचबरोबर रणवीर आणि जीवानं एकत्र डान्सही केला. सिनेमात अभिनेत्री दीपिका पदुकोण ही कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा हिंदी व्यक्तिरिक्त तमिळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हिंदुस्थानी क्रिकेट विश्वातील एका इतिहासाच्या कथा सांगणारा कबीर खान दिग्दर्शित ’83’ येत्या 10 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.

पाहा चित्रपटाचं मोशन पोस्टर-

आपली प्रतिक्रिया द्या