Video – रॉकी और रानी की प्रेम कहानीचा ट्रेलर प्रदर्शित

जवळपास सात वर्षांनी पुन्हा दिग्दर्शनाकडे वळलेल्या करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. आता ती उत्सुकता शमली आहे.

या चित्रपटात रॉकी रंधावा आणि रानी अशा दोघांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. रॉकी हा पंजाबी कुटुंबातला आहे आणि रानी ही बंगाली आहे. त्यांच्या प्रेमकहाणीचे व्हिलन त्यांचेच कुटुंबीय आहेत. अशा कुटुंबाचा विरोध मोडून काढण्यासाठी आणि लग्नासाठी परवानगी मिळवायला हे दोघंही एक निर्णय घेतात, त्याचं पुढे काय होतं, ते चित्रपटात पाहावं लागेल. पण, या सगळ्याची झलक ट्रेलरमधून दिसून येत आहे.

या निमित्ताने रणवीर सिंग आणि आलिया भट ही जोडी गली बॉयनंतर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. या चित्रपटातला आलिया भटचा लुकही सध्या चांगलाच लोकप्रिय आहे.

पाहा व्हिडीओ –