Video- रोहित शर्माचा सुपर कॅच! पाहाल तर तुम्हीही कौतुक कराल…

हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासात शुक्रवारी गुलाबी क्रांती घडली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ‘टीम इंडिया’ प्रथमच गुलाबी चेंडूवर बांगलादेशविरुद्ध कारकीर्दीतील पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर उतरली आहे.

देशाच्या इतिहासातील पहिल्या डे नाईट कसोटीत हिंदुस्थानने आक्रमक सुरुवात करत पाहुण्या बांगलादेशची दाणादाण उडवली. बांगलादेशचा वारू अवघ्या 106 धावांवरच रोखण्यात हिंदुस्थानचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांचा मोठा हात होता. यातही रोहित शर्माने घेतलेला एक अप्रतिम झेल सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. कारण, रोहित शर्माच्या या अवाक् करणाऱ्या झेलमुळे बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकला माघारी परतावं लागलं.

त्याचं झालं असं की, संकटात सापडलेल्या बांगलादेशचा डाव सावरण्यासाठी फलंदाजीसाठी मोमिनुल हक सरसावला होता. 11व्या षटकात उमेश यादवने पुन्हा एकदा भेदक गोलंदाजीचा प्रहार केला. चेंडू बॅटला लागला आणि स्लीपला उभ्या असलेल्या रोहित शर्माने सुपरमॅनच्या आवेशात चेंडूकडे झेपावला आणि जराही चूक न करता त्याने झेल घेत हकची विकेट काढलीच. रोहित शर्माने एका हाताने घेतलेला झेल पाहून शेजारचे खेळाडूही चक्रावले. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून रोहितच्या या झेलाचं कौतुक होताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या