Video – ….जेव्हा ‘शक्तिमान’लाही पकडतात ट्रॅफिक पोलीस

1641

मोटार वाहतूक कायद्यात बदल केल्यानंतर देशभरात दंडाच्या रकमेची वसुली हा एक नवीन विषय चर्चिला जाऊ लागला आहे. सामान्य माणूस असो किंवा खुद्द ट्रॅफिक पोलीस, सगळ्यांना भराव्या लागणाऱ्या दंडाच्या बातम्याही चांगल्याच गाजत आहेत. अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात चक्क शक्तिमान या सुपरहिरोला दंडाची रक्कम भरायला लागल्याचं दिसत आहे.

या व्हिडीओत ट्रॅफिक पोलीस शक्तिमानला पकडताना दिसत आहेत. तुझ्याकडे कोणताही परवाना नाही, तरीही तू इथून तिथे उडत जातोस, म्हणून आता तुलाही दंड भरावा लागेल, असं पोलीस त्याला सांगतात. त्यावर शक्तिमान अंचब्याने त्यांच्याकडे बघत राहतो, असं या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावरही धमाल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शक्तिमान हा अस्सल देशी सुपरहिरो 90च्या दशकात तुफान लोकप्रिय झाला होता. अभिनेता मुकेश खन्ना यांनी साकारलेली ही भूमिका लहान मुलांच्या आवडीची बनली होती. या मालिकेला बंद होऊनही बरीच वर्षं होऊन गेली आहेत. तरीही आजही शक्तिमान तमाम प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या