व्हिडीओकॉनचे  वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणात  व्हिडीओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या धूत यांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे.

सीबीआयने गेल्या आठवडय़ातच बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. त्यानंतर वेणुगोपाल धूत यांच्यावर कारवांई करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ असताना चंदा कोचर यांनी नियम डावलून व्हिडीओकॉन समूहाला 3 हजार 250 कोटींचे कर्ज दिले होते. त्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक यांचा व्यावसायिक फायदा करून दिल्याचा आरोप आहे.