Video – भोंदू बाबासोबत त्याच्या राजकारणातील भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक नेते आणि पुढारी यांचे भोंदू बाबासोबतचे फोटो उघड झाले आहेत. त्यामुळे कर्तृत्वशून्य नेत्यांना असे मार्ग अवलंबावे लागतात, हेच यातून दिसून येते. त्यांना अशा भाकड आणि भोंदूगिरीचा आसरा घ्यावा लागतो. असे नेते भोंदू आणि भाकड आहेत, त्यांचे काहीच कर्तृत्व नाही, हेच दिसत आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. एक सगळ्यांच्या पापावर पांघरून घालणारे खाते मुख्यमंत्र्यांनी सुरू करावे आणि त्यांनी ते खाते स्वतःकडेच ठेवावे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी हाणला.