
सामना प्रतिनिधी । बीड
दाक्षिणामनाय शारदापीठ शृंगेरी श्री श्री 1008 श्री विधिशेखर भारती स्वामी यांचे बीड मध्ये आगमन झाले. बलभीम चौकातून भव्य आणी प्रचंड शोभायात्रेला सुरुवात झाली. शहरातील हिंदू बांधवाचा सहभाग मोठया प्रमाणावर होता. ढोल, ताशा, लेझीम पथक, झेंडा धारी आश्व, भक्त आणी महिलांचा मोठा सहभाग ही शोभायात्रा माळीवेस, सुभाष रोड, डीपी रोड मार्गे सहयोग गणपती मंदिराजवळ पोहोचली. शिस्तबद्ध पध्दतीने निघालेली मिरवणूक मार्गस्थ झाली. वाहतूक अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलीस तैनात करण्यात आले होते. त्या नंतर विधिवृत धार्मिक पूजेला सुरुवात झाली.
शंकराचार्याची शोभायात्रा अंधारात
बीड मध्ये शंकाराचर्याचे आगमन झाले. बलभीम चौकातून सहयोग नगर गणपती प्रांगणा पर्यंत शोभायात्रा निघाली. सायंकाळी साडेसहा वाजता मिरवणूक मार्गस्थ झाली, मात्र पुढे जात असताना अंधार पडला संपूर्ण रस्त्यावर ची मुख्य वीज बंद असल्यामुळे अंधारातच मिरवणूक काढावी लागली, एवढा सोहळा बीड मध्ये होत असताना नगर पालिकेला मात्र याचे मात्र काहीच गांभीर्य नव्हते. मोठा निधी खर्च करून शहरात एलइडी बसवले, विकासासाठी कोट्यवधीचे उड्डाणे घेत असताना शहरातील पथ दिवे मात्र बंद आहेत.


























































