…तेव्हा पायाखालची जमीन सरकलेली, शाहरूखबाबत विद्या बालनचा गौप्यस्फोट

4093

अभिनेत्री विद्या बालन हिला बॉलिवूडमध्ये 14 वर्ष पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत तिने अनेक टॉपच्या कलाकारांसोबत काम केले आहे आणि एकटीच्या बळावरही हिट चित्रपट दिले आहेत. परंतु बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान याच्यासोबत तिने एकही चित्रपट केलेला नाही परंतु दोघेही दोन गाण्यांपुरते एकत्र स्क्रिनवर झळकले आहेत. शाहरूखसोबतच्या पहिल्या भेटीसंदर्भात तिला एका चाहत्याने प्रश्न विचारला. शाहरूखसोबतच्या पहिल्या भेटीवेळी माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटल्याची प्रतिक्रिया विद्या बालन हिने दिली आहे.

आज तक‘ने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरूखसोबतच्या पहिल्या भेटीबाबत बोलताना विद्या म्हणाली की, शाहरूखचे व्यक्तीमत्व खूपच आकर्षक आहे. परंतु त्याची पहिली भेट झाली तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली होती, असेही ती म्हणाली. विद्या बालन हिने 2007 मध्ये पहिल्यांदा ‘ओम शांती ओम’च्या दीवानगी-दीवानगी या गाण्यामध्ये शाहरूखबोत काम केले होते. यानंतर ‘बेबी’ या चित्रपटात दोघांनी पाहुण्या कलाकाराचे काम केले. परंतु भविष्यात चांगली स्क्रिप्ट मिळाल्यास त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा विद्याने व्यक्त केली.

‘मिशन मंगल’मधील भूमिकेचे कौतुक
नुकताच विद्या बालन हिची भूमिका असणारा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यातील तिच्या भूमिकेचे कौतुक सुरू आहे. 15 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे कोटीचे कोटी उड्डाण सुरू आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे

आपली प्रतिक्रिया द्या