
सामना ऑनलाईन, मुंबई
क्विन्स नेकलेस, चौपाटी आणि मुंबईचे वैभव पाहता येणाऱ्या ‘व्ह्य़ूइंग गॅलरी’चे उद्या 10 ऑक्टोबर रोजी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मलबार हिल येथे बांधण्यात आलेल्या या गॅलरीला दिवंगत शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांचे नाव देण्यात आले आहे. चार मजली असणाऱ्या या व्ह्य़ूइंग गॅलरीमधून मुंबईकरांना स्वप्ननगरी मुंबईचा नजारा पाहता येणार आहे. या ‘प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरी’चा लोकार्पण सोहळा सायंकाळी 4.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना नेते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम उपस्थित राहणार आहेत.
























































