कर्नाटक-तामीळनाडूमध्ये जेतेपदाची झुंज, विजय हजारे ट्रॉफीत दाक्षिणात्य संघांमध्ये लढत

417

विजय हजारे ट्रॉफीत दाक्षिणात्य संघांमध्ये जेतेपदाची झुंज पाहायला मिळणार आहे. कर्नाटकने बुधवारी झालेल्या उपांत्य लढतीत छत्तीसगडला तर तामीळनाडूने गुजरातला पराभूत करीत फायनलचे तिकीट बुक केले. आता येत्या शुक्रवार, 25 ऑक्टोबरला होणार्‍या जेतेपदाच्या लढतीत कर्नाटक व तामीळनाडू यांच्यामध्ये चुरस लागेल हे निश्चित.

छत्तीसगडकडून मिळालेल्या 224 धावांचा पाठलाग करणार्‍या कर्नाटकने अवघा एक गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. अजय मंडलने देवदत्त पडीकलला 92 धावांवर बाद केले. लोकेश राहुलने 1 षटकार व 6 चौकारांसह नाबाद 88 धावांची खेळी साकारत कर्नाटकचा विजय निश्चित केला.

लढतीत एकच अर्धशतक

गुजरात व तामीळनाडू यांच्यामधील उपांत्य लढतीत फक्त एकच अर्धशतक झळकले गेले. मसूद शाहरुख खानने तामीळनाडूचे प्रतिनिधित्व करताना नाबाद 56 धावा करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. तामीळनाडूने ही लढत 5 गडी व 6 चेंडू राखून जिंकली.

आपली प्रतिक्रिया द्या