#INDvPAK बदली खेळाडू म्हणून आला अन् भाव खाऊन गेला

सामना ऑनलाईन । मॅनचेस्टर

कोणाचं नशीब कधी फळफळेल हे सांगता येत नाही. एकवेळ वर्ल्डकपमध्ये स्थान मिळणार की अशा स्थितीत असलेला अष्टपैलू विजय शंकर वर्ल्डकपच्या पहिल्याच लढतीत, पहिल्याच चेंडूवर बळी घेतो आणि पदार्पणाचा सामना अविस्मिरणीय करून जातो. इथेही त्याला नशीबाची साथ मिळते.

हिंदुस्थानचा आघाडीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पायांचा स्थायु दुखावला गेल्याने मैदानातून बाहेर जातो. भुवीचे षटक पूर्ण करण्यासाठी आलेल्या विजय शंकरला पहिल्याच चेंडूवर बळी मिळतो. विजय शंकरच्या चेंडूवर पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज इमान-उल-हक चकतो आणि चेंडू पॅडवर आदळतो. विजय शंकर आणि टीम इंडियाचे खेळाडू पायचितची अपिल करतात आणि पंच बोट वर करतात. वर्ल्डकपमधील पदार्पणाच्या पहिल्याच लढतीत, पहिल्याच चेंडूवर बळी घेतल्याचा आनंद शंकरच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो. विराटही टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिल्याबद्दल त्याला शाबासकी देतो.