महायुतीत मिंधे गट 120 जागा मागतील आणि 300 जागा जिंकून आणतील असा टोला काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी लगावला आहे. तसेच पैशांच्या बळावर जागा जिंकू असं लुटेरे आणि डाकुंना वाटतं असेही वडेट्टीवार म्हणाले.
महायुतीत एकनाथ शिंदे गट 120 जागा लढवणार आणि 100 जागा जिंकूण आणण्याचा निर्धार केला आहे अशी माहिती एका पत्रकाराना दिली. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, 120 काय 300 जाग निवडून आणतील, कारण त्यांनी महाराष्ट्राची तिजोरी साफ करून ठेवली आहे. पैशांच्या बळावर आपण जागा जिंकू असं या लुटेरे आणि डाकूंना वाटतं असेही वडेट्टीवार म्हणाले. गेल्या अडीच वर्षात सरकारने फक्त टेंडर काढले आहेत, मुंबईतल्या महत्त्वाच्या जमिनी गुजराती व्यापाऱ्यांना विकून यात गोंधळ घातला आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.