प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे लघु चित्र (शॉर्ट फिल्म) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी कुठल्याही विषयावर शॉर्ट फिल्म्स पाठवता येतील. शॉर्ट फिल्म्स जास्तीत जास्त 20 मिनिटांची असावी. त्यासाठी 25 वर्षांखालील आणि 25 वर्षांवरील असे दोन वयोगट ठेवण्यात आले आहेत. तसेच शॉर्ट फिल्म्स मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत पाठवता येतील. स्पर्धेत सादर होणाऱ्या सर्व शॉर्ट फिल्म्स ‘प्लानेट मराठी’ ओटीटी चॅनेलवर दाखवण्यात येतील.
प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका पाठवता येईल. दोन्ही गटातील सर्वोत्कृष्ट विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिक [email protected] या संकेतस्थळावर 15 नोव्हेंबरपर्यंत पाठवायच्या आहेत. प्रवेश मूल्य रुपये 500 आहे. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ संकलक राजन वाघधरे, जाहिरात तज्ञ भरत दाभोळकर, ज्येष्ठ चित्रपट संकलक भक्ती मायाळू आणि लेखिका – गीतकार रोहिणी निनावे हे आहेत.