हिंदुस्थानी कुस्तीपटू विनेश फोगाट चक्कर येऊन पडली आहे. शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळे विनेशची तब्येत बिघडली. सध्या विनेशची प्रकृती स्थिर आहे.
पॅरिसमधल्या ऑलिम्पिकमधून विनेश फोगाट अपात्र ठरली. पन्नासपेक्षा जास्त वजन असल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आले. ही बातमी बाहेर येताच विनेशची तब्येत बिघडली आणि ती चक्कर येऊन पडली. डिहाड्रेशन म्हणजेच शरीरात पाणी कमी झाल्यामुळे तिची प्रकृती बिघडली.
विनेशला ऑलम्पिक गावातल्या पॉलिक्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपाचार करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे.