
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशीष शेलार यांची तेलंगणातील महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी ही घोषणा केली. राजस्थान भाजपचे माजी अध्यक्ष अशोक परनामी व राज्यसभा खासदार रेखा शर्मा हे शेलार यांच्यासोबत सहप्रभारी म्हणून काम पाहतील, तर चंदिगड महापालिका महापौर निवडणुकीचे निरीक्षक म्हणून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.






























































