1948 सालच्या ‘विन्टेज’ची झाली इलेक्ट्रीक कार

तुमच्याकडे कोणतीही जुनी गाडी, विंटेज कार असेल आणि तुम्हाला ती रस्त्यावर चालवायची असेल तर…. एकदम सोपं आहे. दिल्ली आयआयटीच्या सेंटर फॉर एक्सलेन्स फॉर क्लीन एयर (सीईआरसीए)ने एक उत्तम पर्याय शोधला आहे. सीईआरसीएने विंटेज कारचे रूपांतर इलेक्ट्रिक कारमध्ये केले आहे. यामुळे तुमची जुनी गाडी रस्त्यावर धावेल आणि त्यात डिझेल-पेट्रोल लागणार नसल्याने पर्यावरणाचे रक्षणही होईल.

सीईआरसीएने नुकतेच 1948 सालचे मॉडेल असलेली वोल्सवॅगन बिटल गाडी चक्क इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरीत केली. या कारची बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 70 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकते. गरजेनुसार आपण छोटी बॅटरीही वापरू शकतो. गाडीत पेट्रोल आणि डिझेल नसल्यामुळे कार्बन उत्सर्जन होणार नाही.

आयआयटी दिल्लीच्या या अनोख्या प्रयोगाचे प्रकल्प समन्वयक हेमंत काwशल यांच्या मते पेट्रोल-डिझेलवर चालणाऱया कारचे रूपांतर इलेक्ट्रिक कारमध्ये करण्याच्या प्रक्रियेला दोन महिन्यांचा वेळ लागेल. त्यासाठी चार ते पाच लाखांचा खर्च होईल. हा खर्च कमी होईल का, या दृष्टीने विचार सुरू आहे. मात्र पर्यावरणाचा बचाव करणे आणि आपली आवडती कार भंगारात न टाकता पुन्हा रस्त्यावर आणण्याच्या हौसेला मोल नाही, असे काwशल यांना वाटतंय.

आपली प्रतिक्रिया द्या