मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. आज रत्नागिरीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने मारुती मंदिर येथे निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये भ्रष्टाचार झाला असून दोषींवर कडक कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.