Viral Video – नदीत माणूस बुडताना दिसला, पाहा हत्तीच्या पिल्लाने काय केलं

3058

केरळ (Kerala) मध्ये एका गर्भवती हत्तीणीला (Pregnant Elephant) काही जणांनी फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातलं. ज्याचा स्फोट होऊन नदी मध्येच ती पडली आणि तिचा मृत्यू झाला. संबंधित फोटो आणि वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यानंतर देशभरात या घटनेचा निषेध करण्यात आला. बॉलीवुड कलाकारांपासून अनेक मोठ्या संस्थांनी आरोपीना शोधून त्यांना शिक्षा देण्याची मागणी केली आहे. याच दरम्यान सोशल मीडिया (Social Media) वर एक जूना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल (Viral Video) झाला आहे.

या व्हिडीओ मध्ये हत्तीच्या पिल्लाला एक माणूस बुडताना दिसतो. त्याला वाचवण्यासाठी पिल्लू पाण्यात उतरते आणि त्याला किनाऱ्यावर परत आणतो. खरं तर हा माणूस पाण्यात पोहोत होता, पण हत्तीच्या पिल्लाला तो बुडत असल्याचे वातल्यानं ते पाण्यात उतरलं.

केरळ मधील ताज्या घटनेनंतर हा व्हिडीओ प्रचंड शेअर होत आहे. हत्ती माणसाला वाचवतो, प्रेम करतो, पण माणूस त्याची काळजी घेत नाही. अनेक सोशल मीडियाचे पेज हा व्हिडीओ शेअर करत आहे. व्हिडीओ बघून तुम्हाला हत्तीमधील ‘माणुसकी’ दिसेल. व्हिडीओ मधील माणूसही हत्तीला थँक्यू म्हणताना दिसत आहे.

नेचर एंड एनिमल नाम के ट्विटर पेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत लिहिले आहे की , ‘हत्तीच्या पिल्लाला वाटलं की माणूस बुडतोय त्याने त्याला वाचवले. मात्र आपण (माणूस) त्याच्या लायक नाही.’

3 जून रोजी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 4 लाखांहून अधिक व्ह्यूज झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या