प्रियांका चोप्राचा व्हिडीओ व्हायरल; काही वेळात मिळाले लाखों व्ह्यूज

935

बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये तिचा पती आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनस हा प्रियंकासोबत दिसला होता. हा फोटो करवा चौथचा होता. आता प्रियांकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रियंकाने स्वतःच तीन दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता.

प्रियांकाने शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत इन्स्टाग्रामवर 82 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रियंका एका लहान मुलीसोबत पाण्यात खेळताना दिसत आहे. प्रियंकाची ही अदा लोकांना खूप आवडत आहे. या व्हिडीओवर अनेक लोक लाईक आणि कमेंट करत आहेत.

नुकतीच प्रियांका फरहान अख्तरसोबत ‘द स्काय इस पिंक’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात जायरा वसीम आणि रोहित सराफ देखील मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे कथानक चांगले असून समीक्षकांनीही पसंतीचा शिक्कामोर्तब केला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही.


View this post on Instagram

We’re so cute ! @sky.krishna ❤️ #positiveaffirmations #blessednotstressed #girllove @divya_jyoti

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

आपली प्रतिक्रिया द्या