‘या’ महिलेने पकडला 20 किलो वजनी अजगर, पाहा व्हिडीओ…

782

सापाला पाहूनच अनेक लोकांना धडकी भरते. मात्र एका महिलेने चक्क 20 किलो वजनी अजगर पकडल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एका वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीचा आहे. जो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नौदलाच्या एका माजी अधिकाऱ्याने शेअर केला आहे. अजगर पकडताना महिलेचा हा व्हिडीओ पाहून अनेक लोक त्यांच्या शौर्याचे कौतुक करीत आहेत.

नेव्हीमध्ये असलेले हरिंदर सिक्का यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हा 20 किलो वजनी अजगर नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीने जिवंत पकडला. असे किती पुरुष आहेत जे अशा प्रकारे धैर्य दाखवू शकतात. मी माझ्या नौसेनावर प्रेम करतो ‘

आपली प्रतिक्रिया द्या