धोनीच्या आधी कर्णधार विराटने जाहीर केला निवृत्तीचा प्लॅन, वाचा सविस्तर…

2693

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकापासून मैदानात उतरलेला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चा कायम सुरू असतात. हा, पण त्याने अद्याप निवृत्तीची तारीख जाहीर केलेली नाही. एकीकडे क्रीडाप्रेमींचे धोनीकडे लक्ष असताना दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या निवृत्तीचा प्लॅन जाहीर केला आहे.

टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघात 21 फेब्रुवारीपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. याआधी न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाने टी-20 मालिकेत 5-0 असे निर्भेळ यश मिळवले तर एक दिवसीय मालिकेत यजमान संघाने विराट सेनेला व्हाईटवॉश दिला. टीम इंडियाने टी-20 मालिका जिंकली असली तरी कर्णधार विराट कोहलीने मात्र ‘रनमशीन’ या नावाला साजेशी कामगिरी केलेली नाही. त्यानंतर एक दिवसीय सामन्यांमध्ये तर त्याला एकदाही अर्धशतकी खेळी करता आली नाही.

kohli

क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये असा बॅड पॅच येत असतो. या बॅड पॅचमधून सावरून सचिनसारखे अनेक खेळाडू पुढे धावांचा पाऊस पाडतात, तर काही निवृत्तीही घेऊन टाकतात. विराटच्या कारकीर्दीतही असाच बॅड पॅच आल्याचे दिसत आहे. सततच्या दौऱ्यांमुळे आणि व्यग्र क्रिकेट कार्यक्रमामुळे न्यूझीलंड दौऱ्यात विराटकडून चांगली कामगिरी झाली नाही, त्यामुळे त्याने निवृत्तीचा प्लॅन जाहीर केला आहे.

virat

याबाबत बोलताना विराट कोहली म्हणाला की, मी गेल्या 9 वर्षांपासून सलग क्रिकेट खेळत आहे. वर्षभरात जवळपास 300 दिवस मी क्रिकेट खेळण्यात व्यग्र असतो. अनेकदा क्रिकेट सामने नसले तरी सराव सुरू असतो. फिटनेसवरही काम करावे लागते. परंतु आता यापुढील वर्षांमध्ये ही गोष्ट अशीच कायम राहील की नाही माहिती नाही. तो पुढे म्हणाला की, मी माझ्या कारकीर्दीसाठी एक प्लॅन बसवला असून यापुढील 3 वर्षे मी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळत राहील. परंतु त्यानंतर तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणार की नाही हे सांगू शकत नाही. कारण क्रिकेटचे कार्यक्रम व्यग्र झाले असून तिन्ही प्रकारात खेळता येईल की नाही हे मला अजून ठरवला आलेले नाही, असेही विराट यावेळी म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या