विराट कोहलीने घेतली कोरोनाची लस

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोमवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. विराटने लस घेतानाचा पह्टो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. कृपया लस घ्या, सुरक्षित राहा, असे आवाहनही विराटने देशवासीयांना केले आहे. इंग्लंड दौऱयावर जाणाऱया खेळाडूंमध्ये कोरोना लस घेणारा कोहली हा पाचवा क्रिकेटपटू ठरला.

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासह कोरोना लस टोचून घेतली. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा व अजिंक्य रहाणे यांनीही सपत्नीक कोरोनाची लस घेतली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर लस घेतानाचा पह्टो पोस्ट करत कोरोना योद्धय़ांचे आभार मानले आहेत. याआधी संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि उमेश यादव, चेतेश्वर पुजारा यांनीही कोरोनाची लस घेतलेली आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी आणि इंग्लंड दौऱयासाठी शुक्रवारी हिंदुस्थानच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून मध्यातच माघार घेणारा रवींद्र जडेजा, हनुमा विहारी यांसह अनेक खेळाडूंचे ‘टीम इंडिया’त पुनरागमन झाले आहे. मात्र अष्टपैलू हार्दिक पांडय़ा आणि युवा सलामीवीर पृथ्वी शॉ यांची इंग्लंड दौऱयासाठी संघात निवड होऊ शकली नाही.

साऊदम्पटन येथे 18 ते 22 जूनदरम्यान भारत-न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत रंगणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या