टीम इंडियाशी दोन हात करणार आहात, …अशी अवस्था होणार : सेहवागचा इशारा

सामना ऑनलाईन । लंडन

टीम इंडिया इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत आपला दम दाखवत आहे. हिंदुस्थानने 4 सामन्यांपैकी 3 सामने जिंकले, तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे हिंदुस्थानचे 7 गुण झाले आहेत. हिंदुस्थानने दमदार प्रदर्शन करत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यासारख्या संघांना धूळ चारली आहे. पाकिस्तानविरुद्धचा हिंदुस्थानचा विजय नेहमीप्रमाणेच खास ठरला.

आता या स्पर्धेत टीम इंडियाचे उर्वरित सामने अफगाणिस्तान, इंग्लंड, बांग्लादेश आणि श्रीलंका या संघांशी होणार आहेत. या प्रतिस्पर्ध्यांना हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने बाबांनो, तुम्ही आता टीम इंडियाशी दोन हात करणार आहात, मग सावधान! तुमची या चित्राप्रमाणे अवस्था होऊ शकते असा इशारा दिला आहे. सेहवागने त्याच्या पत्नीसोबतचा एक गंमतीशीर फोटो ट्विट केला आहे. त्यावर त्याने आपल्या पत्नीच्या गळ्याभोवती हात आवळला असून हिंदुस्थानच्या प्रतिस्पर्ध्यांची अशी अवस्था होणार असा इशारा देणारी फोटो कॅप्शनही दिली आहे.