महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी विठ्ठल राठोड यांची नियुक्त झाली आहे. त्यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. यावेळी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे विठ्ठल राठोड यांनी सांगितले. जगभरातील निर्मितीसंस्था महामंडळाच्या जागेवर चित्रीकरणासाठी आनंदाने येतील अशा प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. बदलत्या काळाबरोबर चित्रनगरीचा पुनर्विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक दर्जाची चित्रनगरी निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्या सोबतच चित्रीकरणाची संख्या वाढवून उत्पन्न वाढीची गरज त्यांनी अधोरेखित केली.