शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे वोडाफोन-आयडियाही मराठीत बोलणार, सेवा देण्यासाठी मराठी तरुण-तरुणींना नोकऱ्याही देणार; शिवसंचार सेनेला कंपनीची पत्राद्वारे ग्वाही

दूरसंचार क्षेत्रात मराठीचा प्राधान्याने वापर व्हावा यासाठी शिवसेना सातत्याने प्रयत्नशील आहे. त्या प्रयत्नांना यशही येत आहे. एअरटेलनंतर आता वोडाफोन-आयडिया कंपनीनेही ग्राहकांशी मराठीत बोलण्याचा निर्णय घेतला आहे. दूरध्वनी ग्राहक सेवा मराठीत सुरू करण्याची लेखी ग्वाही शिवसेनेला दिली आहे.

वोडाफोन-आयडिया कंपनीने शिवसेनेचे राज्य संघटक व शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांना पत्र लिहून याबाबत आश्वस्त केले आहे.

काही दिवसांपासून मोबाईल गॅलरीमध्ये ग्राहकांशी मराठीत संवाद साधण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाद निर्माण झाला होता. मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांची मराठी भाषेतच संवाद साधला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली होती. त्यानंतर एअरटेल कंपनीने मोबाईल ग्राहकांशी मराठीतून संवाद सुरू केला. आता वोडापह्न-आयडिया कंपनीनेही मराठीत सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसंचार सेनेच्या पाठपुराव्यामुळे 

वोडापह्न-आयडियाची ग्राहक सेवा मराठी भाषेतून मिळणार आहेच, पण त्यासाठी कंपनी आपल्या गॅलरी आणि ग्राहक सेवा पेंद्रांमध्ये मराठी भाषेत सेवा देण्यासाठी मराठी तरुण-तरुणींची नियुक्ती करणार आहे. त्यामुळे मराठी तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.