वोडाफोन-आयडियाचे नेटवर्क डाऊन; ग्राहकांकडून सोशल मीडियावर धुलाई

मेट्रो शहरांसह देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी वोडाफोन-आयडियाची ग्राहकांकडून सोशल मीडियावर धुलाई सुरू आहे. बुधवारी रात्रीपासून अचानक नेटवर्क ढेपाळल्याने ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेकांचे वर्कफ्रॉम होम सुरू असल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागला.

9 तास झालेत आता आणखी किती काळ वाट बघायची. नक्की काय बिघाड झाला आहे? असा सवाल एका ग्राहकाने विचारला आहे.

Vi च्या अॅपवर चेक केल्यास आपल्या फोनमध्ये Viचे सीम नाही असा चक्क चुकीचा मेसज येत आहे. याचा स्क्रीन शॉट एका महिला युझरने ट्वीट केला आहे.

राज्यातील अनेक भागात बुधवार रात्रीपासून Vi चे नेटवर्क विक झाल्याच्या तक्रारी येत होत्या. विशेष म्हणजे पुणे आणि आसपासच्या भागात Vi च्या ग्राहकांनी आपला रोष सोशल मीडियावरून व्यक्त केला आहे. तर मुंबईत काही भागात Vi चे नेटवर्क गुल झाले आहे.

विशेष म्हणजे Viचे अॅप किंवा ग्राहक सेवा विभागाशी देखील संपर्क करणे अवघड जात असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये वोडाफोन-आयडिया नेटवर्क आघाडीवर होते. #vodafoneindia वापरत ग्राहकांनी नेटवर्क परिस्थितीवर जोरदार टीका केली.

आपली प्रतिक्रिया द्या