ही आहे ‘व्हॉल्वो’ची पहिली इलेक्ट्रिक कार! या दिवशी होणार लॉन्च..

3604

प्रसिद्ध कार निर्माता कंपनी व्हॉल्वो लवकरच हिंदुस्थानात आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. भविष्यात कंपनी आपल्या सर्व कार या इलेक्ट्रिक करणार असल्याचे व्हॉल्वोने म्हटले आहे. कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक XC40 SUV कार 16 ऑक्टोबर रोजी हिंदुस्थानात लॉन्च करणार आहे.

व्हॉल्वो कार सेफ्टी हेड Malin Ekholm म्हणाले की, कार इलेक्ट्रिक असो वा कोणतीही ती सुरक्षित असणं खूप महत्त्वाचं आहे. ही कार आतापर्यंतची सर्वात सुरक्षित कार असेल. कारच्या सेफ्टीसाठी इंजिनिअरने कारच्या संपूर्ण डिझाईनमध्ये बदल केला आहे. याची सेफ्टीही दुसऱ्या व्हॉल्वो कार सारखीच असणार आहे. XC40 कारमध्ये बॅटरी ठेवण्यासाठी अ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेल्या सेफ्टी केजचा वापर करण्यात आला आहे. जो कारच्या मध्यभागी ठेवण्यात येणार आहे. यामुळे कारचा अपघात झाल्यास वाहन फिरत नाही, असेही ते म्हणाले आहेत.

XC40 कारमध्ये कंपनीने Advance Drive Assist System (ADAS) दिले आहे. ADAS हा एक आधुनिक सिस्टिम असून यामध्ये अनेक रडार, कॅमेरे आणि अल्ट्रासॉनिक सेन्सर आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या