
राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मागील पंधरा दिवसांपासून जोरदार प्रचार सुरू होता. 7 फेब्रुवारीला मतदान होणार असल्याने निवडणूक प्रचाराच्या तोफा गुरुवारी रात्री थंडावल्या.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी याआधी 5 फेब्रुवारीला मतदान होणार होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. यामुळे निवडणूक कार्यक्रमात बदल करून 7 फेब्रुवारीला मतदान घेण्याचे निश्चितच केले होते. त्यानुसार 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली. शेवटच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवार आणि नेत्यांनी रोड शो, जाहीर सभांचे आयोजन केले होते. या निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.






























































