…तरीही कुंबळेलाच प्रशिक्षकपदासाठी पाठिंबा होता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, विषाखापट्टनम

अनिल कुंबळे व विराट कोहली यांच्यामध्ये वाद निर्माण झाले आणि रवी शास्त्री यांना प्रशिक्षकपदाची लॉटरी लागली. यावेळी सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली व व्ही व्ही एस लक्ष्मण या सल्लागार समितीकडे प्रशिक्षक निवडीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या प्रकरणावर व्ही व्ही एस लक्ष्मण म्हणाला, अनिल कुंबळे व विराट कोहली यांच्यामध्ये झालेल्या वादानंतरही अनिल कुंबळेलाच प्रशिक्षक म्हणून आमचा पाठिंबा होता. पण त्या प्रकरणानंतर अनिल कुंबळे याने स्वत:हून माघार घेतली.

दरम्यान, व्ही व्ही एस लक्ष्मण याच्या ‘281 ऍण्ड बियॉण्ड’ या आत्मचरित्राचे शुक्रवारी अनावरण झाले. यावेळी व्ही व्ही एस लक्ष्मण, अनिल कुंबळे यांच्यासह राहुल द्रविड याचीही उपस्थिती होती.