प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन

2958

बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन झाले आहे. ते 42 वर्षांचे होते. त्यांना दीर्घ काळापासून किडनी विकार होता. तसंच काही दिवसांपूर्वी ते कोरोनाने संक्रमित झाल्याचं निदानही झालं होतं.

रविवारी त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना चेंबुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही महिन्यांपूर्वीच त्यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. रविवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती आणखी ढासळली. किडनी विकारामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली होती. त्यांना वाचवण्याचे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न अपयशी ठरले आणि त्यांचे निधन झाले. वाजिद यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. सलीम मर्चंट, प्रियांका चोप्रा, सोनू निगम अशा अनेकांनी त्यांच्या आठवणी जागवत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

वाजिद खान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदपैकी एक होते. 1998साली आलेल्या सलमान खान अभिनित प्यार किया तो डरना क्या या चित्रपटाद्वारे त्यांनी संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर चोरी चोरी चुपके चुपके, हॅलो ब्रदर, मुझसे शादी करोगी, पार्टनर, दबंग (1 ते 3) अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. त्यांनी नुकतंच सलमान खानसाठी भाई-भाई नावाचं गाणंही बनवलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या