
आपल्याकडे असलेले आधारकार्ड योग्य आहे की नाही हे जाणून घ्यायचे, अनेक लोकांना बनावट आधारकार्ड कसे ओळखावे हे माहीत नाही.
घरच्या घरी आधारकार्डची पडताळणी करता येते. एक लक्षात घ्या की, भाडेकरू वगैरे ठेवताना पोलीस व्हेरिफिकेशन कोणत्याही परिस्थितीत आवश्यक आहे.
आधारकार्ड व्हेरिफिकेशनसाठी यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ‘माय आधार’ पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आधार व्हेरिफाय पर्याय निवडा.
यानंतर येथे तुम्हाला आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकून व्हेरिफाय बटणावर क्लिक करावे. आधार नंबर ऑक्टिव्ह किंवा डिऑक्टिव्हेट असल्याची माहिती मिळेल.
मोबाइल ऍपवरूनही आधारकार्ड व्हेरिफिकेशन करता येईल. त्यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये एमआधार ऍप इन्स्टॉल करावे लागेल. तिथे आधार क्रमांक टाकावा लागेल.































































