प्रसिद्ध क्रिकेटपटूचे ट्विटर अकाऊंट हॅक, अश्लील व्हिडीओ केले लाईक

1245

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज वकार युनिस याचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. वकारच्या अकाऊंटवरून हॅकरने काही अश्लील पॉर्न क्लिप लाईक केल्या आहेत. त्यामुळे त्याने ते यापुढे सोशल मीडियावर न येण्याचे ठरवले आहे.

वकार युनिस याने आज सकाळी ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. ‘मी आज सकाळी उठलो तेव्हा एका व्यक्तीने माझे ट्विटर अकाऊंट हॅक करून त्यावरून अश्लील व्हिडीओ लाईक केले होते. हे प्रकरण माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाटी त्रासदायक आहे. याआधीही त्या व्यक्तीने असा प्रकार केलेला आहे. त्यामुळे आता माझ्या लक्षात आले आहे की तो व्यक्ती ऐकत नाही. म्हणून मीच आता सोशल मीडियावर न येण्याचे ठरवले आहे. मला या सर्वापेक्षा माझे कुटुंब महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी आता यापुढे सोशल मीडियावर येणार नाही’, असा संदेश त्याने या व्हिडीओतून त्याच्या चाहत्यांना दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या