इस्रायलच्या बचाव मोहिमेला यश; नोवा अर्गमनीची 245 दिवसांनी सुटका

हमास आणि इस्रायलचे युद्ध सुरू आहे. इस्रायलने हमासच्या तावडीतून नागरिकांना सोडवण्यासाठी बचाव मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला यश येत असून शनिवारी चार इस्रायली नागरिकांची सुटका करण्यात आली. त्यामध्ये नोवा अर्गमनी या 26 वर्षीय तरुणीचा समावेश आहे.

7 ऑक्टोबर रोजी नोवा अर्गमनी आणि तिच्या मित्राचे नोवा म्युझिक फेस्टिवलमधून अपहरण झाले होते. तब्बल 245 दिवसांनंतर हमासच्या तावडीतून तिची सुटका झाली आहे. नोवा अर्गमनीच्या अपहरणाचा व्हिडीओ जगभरात व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये नोवा अर्गमनीला हमासच्या दहशतवाद्यांनी वेढलेले दिसत होते. तिला मोटरसायकलवरून डोके झाकून नेण्यात आले. अर्गमनीच्या आजूबाजूला किमान दहा सशस्त्र पुरुष दिसत आहेत, जे तिच्यावर ओरडत होते.

हार मानली नाही

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नोवा अर्गमनीशी संवाद साधला. नेतान्याहू म्हणाले, ‘‘आम्ही एका क्षणासाङ्गीही हार मानली नाही. तुमचा त्यावर विश्वास होता की नाही हे मला माहीत नाही, परंतु आम्ही विश्वास ङ्खेवला आणि मला आनंद आहे की ते खरे झाले. आता कुटुंबासोबत वेळ घालवा. तुमच्या आईला मिठी मारा,’’ नोवा अर्गमनीने नेतान्याहू यांचे आभार  मानले.