सावधान! जूनमध्ये सलग सहा दिवस समुद्र खवळणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या पावसाळ्याच्या कालावधीत समुद्राला तब्बल 24 वेळा मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रामध्ये साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. यामध्ये जूनमध्ये सलग सहा वेळा समुद्र खवळणार आहे. 14 ते 19 जूनपर्यंत सलग सहा दिवस समुद्राला उधाण येणार आहे. त्यामुळे मुंबईकर-पर्यटकांनी अशा वेळी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 16 जुलै रोजी यावर्षीची सर्वात मोठी भरती येणार असून समुद्रात 4.89 मीटरच्या महाकाय लाटा धडकणार आहेत.