पाण्यात दिसला 65 फुटी महाकाय प्राणी आणि त्याला बाहेर काढताच…

1774

नदीत इथून तिथे सुळ्ळकन पोहणारे मासे दिसणं म्हणजे एक गमतीदार प्रकार असतो. पण, कुणाला नदीत 65 फुटांचा लांबलचक मासा दिसला तर? असाच काहीसा प्रकार चीनमध्ये झाला आहे. इथल्या यांग्त्झी नावाच्या नदीत काळ्या रंगाचा एक महाकाय प्राणी पोहताना दिसला आणि एकच खळबळ उडाली.

या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी याला पाण्यातला राक्षस असं म्हणायला सुरुवात केली. इथल्या हुबई प्रांतातून वाहणाऱ्या यांग्त्झी नदीच्या थ्री जॉर्ज या धरण परिसरात तो पोहताना दिसला. काहींनी याला प्रदुषणाची निर्मिती म्हटलं तर काहींना हा पौराणिक राक्षस असावा असं वाटलं. काहींना हा पाण्यात पोहणारा अजस्त्र साप वाटला.

अखेर.. त्या महाकाय राक्षसरुपी प्राण्याला तिथल्या बचाव यंत्रणांनी पकडलं आणि किनाऱ्यावर आणलं. पण, किनाऱ्यावर आणलेला तो राक्षस किंवा साप नव्हता. तर ती होती 65 फुटी लांबलचक एअरबॅग. एका मोठ्या जहाजातून ती बॅग सोडली गेली होती आणि ती नदीच्या प्रवाहात आल्याने एकच कल्ला उडाला होता.

china-65ft-airbag

आपली प्रतिक्रिया द्या