
नवी मुंबई एमआयडीसीतील तुर्भे स्टोअर्स, हनुमाननगर, इंदिरानगर, गणपती पाडा, आंबेडकरनगर, गणेशनगर या गोरगरीबांच्या वस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या झोपडपट्ट्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे शहरातील कॉलनी भागाला धो धो पाणी मिळत असताना झोपडपट्ट्यांतील नागरिकांना मात्र पाण्यासाठी ताटकळत राहावे लागत आहे. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज एमआयडीसी कार्यालयावर धडक देण्यात आली.
नवी मुंबई शहराच्या कॉलनी भागाला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र एमआयडीसीतील झोपडपट्ट्या आजही बारवी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत. तुर्भे एमआयडीसीमधील तुर्भे स्टोअर, हनुमाननगर, इंदिरानगर, गणपती पाडा, आंबेडकरनगर, गणेशनगर, गांधीनगर, चुनाभट्टी गाव, रमेश मेटल कोरी या भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागाला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी आज
बंद कंपन्यांत दारूचे अड्डे
तुर्भे एमआयडीसीमधील अनेक बंद असलेल्या कंपन्या दारू आणि गांजाचे अड्डे बनले आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारुडे आणि चरसींचा वावर असतो. त्यामुळे या भागातील महिला आणि लहान मुलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. काही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच या कंपन्या एमआयडीसीने ताब्यात घ्याव्यात आणि तिथे सुरू असलेल्या चरसींच्या अड्ड्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश कोटीवाले यांनी केली.
एमआयडीसीच्या महापे कार्यालयावर धडक दिली. या आंदोलनात जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, सूर्यकांत मढवी, महेश कोटीवाले, उपशहरप्रमुख सिद्धराम शिलवंत, विभागप्रमुख प्रकाश कर्दवकर, मंगेश मिस्कीन आदी सहभागी झाले होते.



























































