मुंबईसाठी अप्पर वैतरणातून अतिरिक्त पाणी पुरवठा

597

मुंबईसाठी पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन राज्याच्या जलसंपदा विभागाने मुंबईसाठी अप्पर वैतरणा धरणातून 50 दशलक्ष क्युबिक लिटर पाणी सोडले आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. अप्पर वैतरणा धरणातून मुंबईसाठी जादा पाणी सोडण्यासाठी मुंबई महापालिकेने जलसंपदा विभागाकडे मागणी केली होती. त्यानुसार हे पाणी सोडण्यात आले आहे. मुंबईला पाणी पुरविणाऱया अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने मुंबईला पाण्याची कमतरता भासणार नाही, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. मुंबईची लोकसंख्या पाहता मुंबईला मोठय़ा प्रमाणात पाणीपुरवठा करावा लागतो. झोपडपट्टी भागात अनेकदा पाणी मिळत नाही किंवा कमी दाबाने पाणी मिळते. मात्र, वैतरणा धरणातून पाणी सोडल्याने मुंबईकरांना मोठय़ा प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे पाटील म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या