केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे थेट भरतीच्या मोदी सरकारच्या उद्योगावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यानंतर आता भाजपचे सहयोगी आणि पेंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही टीकास्त्र सोडले आहे. सरकारी पदांवर आरक्षण न देता परस्पर कोणाच्याही नियुक्त्या करणे चिंताजनक असल्याचे पासवान यांनी म्हटले आहे. अशा भरतीला आमचा विरोधच आहे. यात जर, तर काहीही चालवून घेणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने अशा परस्पर नियुक्त्यांसाठी थेट भरतीची जाहिरात दिल्याचे उघडकीस आल्यावर विरोधी पक्षांनी एकच वादळ उठवले आहे. ही आरक्षण लुबाडण्याची, हक्क नाकारण्याची मोदी गॅरंटी असल्याचे काल राहुल गांधी यांनी म्हटले होते.
काय म्हणाले पासवान
कोणत्याही सरकारी नियुक्तीमध्ये आरक्षणाच्या तरतुदी असायलाच हव्यात. यात जर तर काहीही चालणार नाही. सरकारी पदांवरही त्याची अंमलबजावणी होत नसेल तर… ही माहिती माझ्यासमोर रविवारी आली आणि ही माझ्यासाठी चिंतेची बाब आहे, असे त्यांनी पीटीआयला सांगितले.