ओटीटीवर झळकण्याच्या नादात मॉडेल्सचे बोल्ड व्हिडीओ पॉर्नसाईटवर, मोठं रॅकेट उघड

1701

लॉकडाऊनमध्ये सिनेमा थिएटर बंद पडल्यामुळे वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत. या वेब सीरिजमध्ये काम देण्याच्या बहाण्याने मॉडेल्सचे अश्लील शूट करण्यात आले होते. मात्र त्यांना काही न सांगता ते पोर्न वेबसाइटवर अपलोड केले गेले. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये सक्रिय असणारी ही संपूर्ण टोळी पोलिसांच्या हाती आली आहे. ज्यांनी आतापर्यंत 5 मुलींना अभिनेत्री करण्याच्या नावाखाली पॉर्न साइटवर फिल्म अपलोड केल्या आहेत.

चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने नवीन मॉडेल्सचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या ब्लॅकमेलर टोळीचा पर्दाफाश इंदूर सायबर सेलने केला आहे. सध्या सायबर सेलने दोन आरोपींना अटक केली आहे, तर चार आरोपी अद्याप फरार आहेत. मॉडेलच्या तक्रारीवरून सायबर सेलने ही कारवाई केली आहे. चौकशी केली असता त्यामागे एक मोठी टोळी कार्यरत असल्याचे आढळून आले.

इंदूरमध्ये राहून मॉडेलिंगमध्ये करिअर करत असलेल्या या तरुणीने पोलिसांना सांगितले की, डिसेंबर 2019 मध्ये स्वत: ला मुंबई येथे दिग्दर्शक आणि निर्माता म्हणवून घेणाऱ्या ब्रिजेंद्र नावाच्या व्यक्तीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठ्या बॅनरच्या लाँच करण्याच्या नावाखाली एरोड्रम रोडवरील फार्म हाऊसमध्ये बोलावले.

मुलगी तिचा कास्टिंग डायरेक्टर मित्र मिलिंदसोबत तेथे पोहोचली. ब्रीजेंद्रने बोल्ड चित्रपटात काम करण्यास सांगून काही दृश्यांचे शूट केले. तो म्हणाले की, अश्लील कंटेंट वगळून ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलिज होईल. मात्र तसे न करता तो व्हिडीओ पॉर्न साइटवर अपलोड केला गेला.

त्या तरुणीला हा प्रकार कळला नाही. काही दिवसात 4 लाख लोकांनी तो व्हिडीओ पाहिला. मुलीला जेव्हा तिच्या ओळखीच्या व्यक्तींनी हे कळवले तेव्हा ती घाबरून गेली आणि तिने ब्रिजेंद्र आणि मित्राशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी हातवर झटकले.

याविरोधात तिने चित्रपटाचा दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्टर यांच्यासह 5 जणांविरोधात तक्रार दाखल केली होती, ज्यात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

सायबर सेलचे एसपी जितेंद्र सिंह म्हणाले की, मॉडेल मुलीने 25 जुलै रोजी एक बोल्ड फिल्म बनवून इंटरनेटवर पॉर्न साइटवर अपलोड केल्याबद्दल तक्रार केली आहे. ताब्यात असलेल्या काही लोकांकडे चौकशी केल्यानंतर हे निष्पन्न झाले की ही एक मोठी टोळी आहे जी इंटरनेटवर लोकप्रिय असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर युवतींना लॉन्च करण्याचे आश्वासन देऊन अश्लील चित्रपट बनवते.

एसपीने याबाबत अधिक माहिती दिली आणि सांगितले की त्याने आधी मुलीला फार्म हाऊसमध्ये नेले. तिथे चित्रपटाच्या नावाखाली एक व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ अश्लील साइटवर टाकण्यात आला आहे, याची मुलीला कल्पना नव्हती. आम्ही दोन आरोपींना अटक केली आहे. आयटी कायद्यातील चौकशी दरम्यान आरोपीने सांगितले की, आणखी 4 मुलींचे व्हिडीओ बनविला गेला आहे आणि तो अश्लील साइटवर अपलोड करण्यात आला आहे.

सायबर सेलच्या तपासणीत हे अश्लील फिल्म बनविणारे रॅकेट असल्याचे उघड झाले. हे रॅकेट मॉडेल मुलींना ब्लफिंग फिल्म आणि वेब सिरीजद्वारे बोल्ड सीन देण्यास सांगतात. मुली ओटीटी व्यासपीठावर चित्रपट मिळवण्याच्या लोभात अडकतात. इंदूरमध्ये चित्रित केलेले हे व्हिडीओ मुंबईत कोट्यवधी रुपयांना विकले जातात.

चौकशीत तरुणींचे शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचे प्रकरणही समोर आले आहेत. पोलिसांच्या आयटी सेलने पाच तरुणांना रडारवर घेतले होते. यात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेनंतर मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या