साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 मे 2025 ते शनिवार 17 मे 2025

>> नीलिमा प्रधान

मेष – वाद वाढवू नका

मिथुन राशीत गुरूचे राश्यांतर, मेषेच्या धनेषात सूर्य. साडेसातीचे पर्व सुरू आहे. प्रवासात काळजी घ्या. क्षुल्लक तणाव, वाद वाढवू नका. नोकरीमध्ये कामाची प्रशंसा होईल. धंद्यात फसगत टाळता येईल. आळस कुठेही करू नका. नवीन ओळख नीट पारखून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चेत रागावर ताबा ठेवा. शुभ दि. 16, 17

वृषभ – कामाचा ताण जाणवेल

मिथुन राशीत गुरूचे राश्यांतर, स्वराशीत सूर्य प्रवेश. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका. दूरदृष्टिकोनातून निर्णय घ्या. नोकरीमध्ये धावपळ होईल. कामाचा ताण जाणवेल. धंद्यात फायदा होईल परंतु वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ मोठे आश्वासन देतील. शुभ दि. 13, 14

मिथुन – अनाठायी खर्च टाळा

स्वराशीत गुरू ग्रहाचे राश्यांतर, मिथुनेच्या व्ययेषात सूर्य. संयमाने वागल्यास निर्णयाची क्षमता वाढेल. अनाठायी खर्च टाळा. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. धंद्यात लक्ष द्या. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ धोरण योग्य ठरू शकते. कायदा सर्वत्र पाळा. चुकीचा मार्ग धरू नका. शुभ दि. 16, 17

कर्क – मैत्रीमध्ये सावध रहा

मिथुन राशीत गुरूचे राश्यांतर, कर्केच्या एकादशात सूर्य. तुमच्या खंबीर नेतृत्वाचे कौतुक होईल, परंतु प्रमाणाबाहेर आत्मविश्वास ठेवल्यास नुकसान होईल. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीमध्ये प्रभाव वाढेल. मैत्रीमध्ये सावध रहा. धंद्यात लाभ होईल. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात खंबीर या स्वभावाचा गैरवापर करून घेतला जाईल. शुभ दि. 13, 14

सिंह – अहंकार दूर ठेवा

मिथुन राशीत गुरूचे राश्यांतर, सिंहेच्या दशमेषात सूर्य. स्पष्टवक्तेपणाने संबंध गढूळ होण्याची शक्यता. मैत्री-नात्यात गैरसमज होतील. प्रवासात सावध रहा. नोकरीमध्ये प्रभाव वाढेल पण अहंकार दूर ठेवा. धंद्यात आळस नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या अपरोक्ष कारस्थाने केली जातील. वरिष्ठ मदत करतील. शुभ दि. 11, 12

कन्या – नवे कंत्राट मिळेल

मिथुन राशीत गुरूचे राश्यांतर कन्येच्या भाग्येषात सूर्य. प्रत्येक दिवस तुमच्या कार्याला प्रेरणा देणारा ठरेल. कठीण कामे करून घ्या. नोकरीची चांगली संधी मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. धंद्यात मोठा लाभ होईल. नवे कंत्राट मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठे काम कराल. पद, प्रतिष्ठा वाढेल. कार्याचे कौतुक होईल. शुभ दि. 13, 14

तूळ – कायदा सर्वत्र पाळा

मिथुन राशीत गुरूचे राश्यांतर, तुळेच्या अष्टमेषात सूर्य. महत्त्वाची कामे करून घेण्याचा प्रयत्न करा. तारतम्य ठेवा. कुशलता वापरावी लागेल. नोकरी टिकवा. धंद्यात धावपळ होईल, परंतु घाई करू नका. कायदा सर्वत्र पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परस्पर विरोधी घटना घडतील. विरोधक व मित्रपक्ष ओळखणे कठीण होईल. शुभ दि. 11, 13

वृश्चिक – नोकरीमध्ये काम वाढेल

मिथुन राशीत गुरूचे राश्यांतर, वृश्चिकेच्या सप्तमेषात सूर्य राश्यांतर. कोणताही निर्णय तारतम्य ठेवूनच घ्यावा. क्षेत्र कोणतेही असो गोड बोलूनच वागा. कायदा पाळा. नोकरीमध्ये काम वाढेल. अचानक बदलाची शक्यता. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक ताणतणाव निर्माण करतील. शुभ दि. 16, 17

धनु – प्रकृतीची काळजी घ्या

मिथुन राशीत गुरूचे राश्यांतर, धनुच्या षष्ठेशात सूर्य राश्यांतर. तुमच्या क्षेत्रात तुमच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाईल. स्पर्धा करणारे वाढतील. गुप्त कारस्थाने वाढतील. नोकरीमध्ये वरिष्ठांची नाराजी होऊ शकते. अपेक्षा वाढतील. धंद्यात शब्द जपून वापरा. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निश्चित धोरण ठरवा. शुभ दि. 11, 12

मकर – महत्त्वाची कामे करा

मिथुन राशीत गुरूचे राश्यांतर, मकरेच्या पंचमेषात सूर्य. सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाची कामे करा. नोकरीमध्ये चिंताजनक बातमी. प्रकृतीची काळजी घ्या. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निश्चित धोरण ठरवणे कठीण जाईल. मित्रांची मदत मिळेल परंतु राग वाढेल. कायदा पाळा. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. शुभ दि. 11, 12

कुंभ – स्पष्ट बोलणे त्रासदायक

मिथुन राशीत गुरू राश्यांतर, कुंभेच्या सुखेषात सूर्य. गुप्त कारवायांवर नजर ठेवा. स्पष्टवक्तेपणा त्रासदायक ठरू शकतो. कुणावरही प्रमाणाबाहेर विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. नोकरीमध्ये धावपळ होईल. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील चढउतार विचलित करणारे असतील. प्रतिष्ठा सांभाळा. शुभ दि. 11, 12

मीन –कर्तृत्व सिद्ध कराल

मिथुन राशीत गुरू राश्यांतर. मीनेच्या पराक्रमात सूर्य. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घालून स्वतचे कर्तृत्व सिद्ध कराल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती कराल. नोकरीमध्ये बदल होतील. धंद्यात नवे मोठे काम मिळेल. कर्जाचे काम होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. ज्ञानात भर पडेल. लोकप्रियता वाढेल. शुभ दि. 13, 14