मुंबईत वेटलिफ्टींग स्पर्धेची सांगता, स्पर्धेतून महाराष्ट्र संघात निवडले जाणार खेळाडू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

बृहन्मुंबई वेटलिफ्टिंग असोसिएशन आणि मुंबई विभाग क्रीडा संघटनेच्या वतीने मुंबईमध्ये २८ ऑक्टोबर म्हणजेच रविवारी  एका वेटलिफ्टींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रभादेवी इथल्या मैदानात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेमध्ये ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी १० गट पाडण्यात आले होते आणि ५५ किलो ते १०९ किलो वजनी गटांसाठी ही स्पर्धा भरवण्यात आली होती. या कार्यक्रमाला छत्रपती पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध वेटलिफ्टर मेधाली कोरगांवकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.दादरमधील उद्योजक आणि भाजपचे सचिन शिंदे हे स्पर्धेचे प्रायोजक होते. मुंबईतील एकूण 13 क्लब्समधील सुमारे 80 वेटलिफ्टर्स खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेतून महाराष्ट्राच्या संघातील खेळाडू निवडले जाणार आहेत अशी माहिती मुंबई वेटलिफ्टर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश गव्हाणे यांनी सांगितले.

स्पर्धेचे विजेते

  • सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर- कौशिक कोणवार
  • सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर (कुमार गट)- अरबाज शेख
  • सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर (वरिष्ठ गट)- रोहित परब