रोज एक ‘हॉरर’ चित्रपट बघा आणि वजन कमी करा

1890


वजन कमी करण्यासाठी यापुढे डाएट करण्याची जिम मध्ये जाण्याची किंवा धावण्याची गरज नाही, तर घरात बसून रोज एक ‘हॉरर’ चित्रपट बघूनही तुम्हांला वजन कमी करता येणार आहे. ऐकायला आणि वाचायला जरी हे गमतीशीर वाटत असलं तरी यात तथ्य आहे, असा दावा इंग्लडमधील वेस्टमिंस्टर विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.

या संशोधकांच्या दाव्यानुसार हॉरर चित्रपट बघताना अनेकांची भीतीने गाळण उडते. अंगाला घाम फुटतो. हाता-पायाच्या तळव्यातून घाम येतो. स्नायू घट्ट होतात. रक्तदाब वाढतो. हीच अवस्था प्रामुख्याने भिती वगळता धावताना किंवा जिममध्ये वर्कआऊट करताना होते. यामुळे धावण्यापेक्षा हॉरर चित्रपट बघणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे.

रोज एक हॉरर चित्रपट बघितल्याने शरीरातील कॅलरीज जळतात. जर तुम्ही 90 मिनिटं एखादा हॉरर चित्रपट बघितलात तर शरीरातील 113 कॅलरीज बर्न होऊ शकते. एवढ्या कॅलरीज बर्न होण्यासाठी साधारणत: 30 मिनिटं धावावं लागतं. दरम्यान, तुम्ही जितके जास्त हॉरर चित्रपट बघाल तेवढेच तुमचे वजन झपाट्याने कमी होईल असेही या संशोधकांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या