
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी SIR ला तीव्र विरोध केला आहे. त्यांनी याबाबत वक्तव्यही केले होते. या वक्तव्याबाबत भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या विधानाचा व्हिडिओ आणि भाषांतर मागितले आहे. ममता यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त मनोज अग्रवाल यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचे आरोप उघड करण्याचा इशारा दिला होता. आता याबाबतचे व्हिडीओ आणि भाषांतर निवडणूक आयोगाने मागितले आहे.
पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र विरोध केला आहे. आता निवडणूक आयोगाने त्यांच्या याबाबतच्या वक्तव्याची दखल घेत त्याचे व्हिडीओ आणि भाषआंतर मागवले आहे. मुख्यमंत्र्यांनी पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) मनोज अग्रवाल यांना जाहीरपणे इशारा दिल्याचा आरोप राज्य भाजपने केला आहे. भाजपच्या या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने रविवारी संध्याकाळपर्यंत ममता बॅनर्जी यांचा व्हिडिओ मागितला आहे.
ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात म्हटले होते की जर सीईओने मर्यादा ओलांडल्या तर त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप उघड केले जातील. त्यांनी सीईओला धमकावल्याचा आरोपही भाजपने तक्रारीत केला आहे. आयोगाने आता या विधानाची क्लिपिंग आणि अचूक भाषांतर मागितले आहे. आयोगाने म्हटले आहे की कोणत्याही अधिकाऱ्याविरुद्धचे आरोप पुराव्यांसह लोकपालांसमोर सादर केले पाहिजेत, सार्वजनिक व्यासपीठांवरून इशारा देण्यात येऊ नये.