Video – दिग्गज क्रिकेटपटूने शेअर केला वर्णद्वेषाचा किस्सा, अश्रू झाले अनावर

958

कृष्णवर्णीय खेळाडूंसोबत भेदभाव होत असल्याचा आरोप सध्या वेस्ट इंडिजच्या काही खेळाडूंकडून केला जात आहे. आता या आरोपानंतर आणखी दिग्गज खेळाडू मायकल होल्डिंग यांच्यासोबत घडलेला वर्णद्वेषाचा किस्सा शेअर केला आहे. एका सामन्याआधी त्यांनी याबाबत.ताना ते भावूक देखील झाले आहेत.

वर्णद्वेषाचा विषय निघाला की मला माझे पालक आठवतात. आताही मला त्यांची आठवण येतेय. त्यांनी खूप काही सहन केले आहे. खरं सांगू तर हा माझ्यासाठी खूप भावनिक विषय आहे माझे वडिल कृष्णवर्णीय होते म्हणून तिच्या माहेरच्यांनी तिच्यासोबत बोलणं थांबवलं होतं. . माझे पालक कोणत्या परिस्थितीतून गेले ते मी बघितलंय. त्यानंतर ते माझ्यासोबत देखील घडलं.’ असं मायकल होल्डिंग यांनी सांगितले आहे.

अमेरिकेत जॉर्ज फ्लायड या कृष्णवर्णीय व्यक्तीला पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना आपले प्राण गमवावे लागले. त्याबद्दल जगभरातून निषेध नोंदवण्यात आला. वर्णद्वेषाचे पडसात क्रिकेटमध्येही उमटताना दिसत आहेत. डॅरेन सॅमी, ख्रिस गेल, कर्णधार जेसन होल्डर या वेस्ट इंडीजच्या क्रिकेटपटूंनी या विरोधात पाऊल उचलले आहे. खेळाडूंना डोपिंग किंवा फिक्सिंग करणाऱयांना जी शिक्षा दिली जाते ती शिक्षा दिली जावी अशी मागणी जेसन होल्डरने आयसीसीकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या