
दहिसर आणि बोरीवली स्थानकादरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची लोकल सेवा रविवारी सायंकाळी दोन तासांसाठी विस्कळीत झाली. सायंकाळी 5.45 वाजता झालेला हा बिघाड दुरूस्त करण्यास सुमारे दोन तास लागल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
पश्चिम रेल्वेच्या दहीसर आणि बोरीवली स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर सायंकाळी 5.45 वाजता ओव्हरहेड वायर तुटल्याने विरार लोकल ऐन गर्दीच्या वेळी अडकून पडली. त्यामुळे प्रवाशांनी लोकल मधून उडय़ा मारत ट्रकमधून नजिकचे स्टेशन गाठले. ओव्हरहेड वायरच्या दुरूस्तीसाठी टॉवर वॅगन घटनास्थळी रवाना करण्यात आली. यावेळी विरार लोकल दहीसर आणि बोरीवली स्थानकात अडकून पडली तर बोरीवली आणि गोरेगाव लोकलला जलद मार्गावरून वळविण्यात आले. सायं. 5.45 वाजता झालेला हा बिघाड दुरूस्त करण्यास रात्रीचे 7.38 वाजले. दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गाने वळविण्यात आल्याने लोकल पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या. रविवारचा दिवस असला तरी कुटुंबासह बाहेर पडलेल्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला.























































