सुमित ठाकुर पश्चिम रेल्वेचे नवे मुख्य जनसंपर्क अधिकारी

पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून सुमीत ठाकूर यांनी काल सोमवारी आपल्या पदाचा भार स्वीकारला. ठाकुर हे भारतीय रेल्वे सेवेतील (इंजिनिअरींग) 2010 सालच्या बॅचचे अधिकारी आहेत. ठाकुर यांनी 2009 मध्ये पाटणा येथून सिव्हील इंजिनिअरींगमधून बी.टेक केले. त्यानंतर 2011 दिल्लीतून स्ट्रक्चरल इंजीनियरिंगमध्ये मास्टरची डीग्री मिळविली आहे. त्यांनी रेल्वेमध्ये 2012 साली प्रवेश केला. पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमध्ये असिस्टंट डिव्हीजल इंजिनिअर पदावर ते रूजू झाले. त्यानंतर ते काही काळ राजकोट डिव्हीजनचे डिवीजनल इंजीनियर पदावर काम करून पुन्हा मुंबईत परतले पावसाचे पाणी साचणार्‍यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी 2018-19 मध्ये केलेल्या कामाला गौरविण्यात आले आहे. 2015 आणि 2019 अशा दोन वेळा त्यांना प्रतिष्ठीत जीएम अवार्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संगीत, चित्रपट आणि खेळांसह त्यांना क्रिएटीव्ह गोष्टींमध्ये रस आहे.

आपली प्रतिक्रिया द्या